- उपलब्ध पाणी जपून वापरा; पालिकेचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जून २०२१) :- रावेत येथील टप्पा १ पंप हाऊसमधील वाल्व फुटल्यामुळे (burst) पंप हाऊसमध्ये पाणी झालेले आहे. वाल्व बदलण्याचे काम सूरु केले आहे. त्यामुळे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने आज सोमवारचा शहरातील पाणीपुरवठा अचानक थांबविला आहे.
सर्व इलेक्ट्रिक पॅनेलमध्ये पाणी गेल्यामुळे सर्व पॅनल पूर्णपणे dry केल्याशिवाय पंप चालू करता येत नाहीत. काम युद्ध पातळीवर सुरू आहे. त्यामुळे आज शहरात सायंकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत राहील. पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचा विभागाचा प्रयत्न राहील. उपलब्ध पाणी जपून वापरून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.