- रुग्ण नसल्यामुळे नाशिक घटनेची पुनरावृत्ती टळली…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जून २०२१) :- आकुर्डीतील पालिकेच्या रुग्णालयाचे मोठ्या थाटात महापौर, खासदार, पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उद्घाटन पार पडले होते. रुग्णालयात ऑक्सिजन पाईपलाईनही बसविली आहे.
मात्र, उद्घाटनानंतर ऑक्सिजन पाईपलाईनची टेस्टिंग करण्यात आली. सिलिंडरमधून पाईपलाईनमध्ये ऑक्सिजन सोडून टेस्टिंग करायला सुरुवात केली. टेस्टिंग करताना मुख्य वाहिनी फुटली. रुग्णालयामध्ये रुग्ण दाखल नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
ऑक्सिजन पाईपलाईनमध्ये काही त्रुटी आहेत का, हे तपासण्यासाठी टेस्टिंग केली. ऑक्सिजन टेस्टिंग प्रक्रियेत मेन लाईन फुटली. टेक्निकल लोकांना बोलावून घेतले होते. टेस्टिंगमध्ये निदर्शनास आलेल्या त्रुटी दूर केल्या जातील, असे आकुर्डी रुग्णालयाच्या जेष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता साळवे यांनी सांगितले.