- विवेक तापकीर यांची अन्न व औषध विभागाकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जून २०२१) :- गर्भपाताच्या औषधांची ऑनलाइन विक्री करण्याऱ्या दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रीक्टचे उपाध्यक्ष विवेक तापकीर यांनी पुण्यातील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सहायक आयुक्त यांच्याकडे केली आहे.
वारंवार करण्यात आलेल्या केमिस्टच्या तक्रारीनुसार ३१ मे २०२१ रोजी सत्यता पडताळणीसाठी अमेझॉन या वेबपोर्टलवरून गर्भपाताचीऔषधे a – kare Safe abort kit औषधांची मागणी केली होती. या औषधांचा पुरवठा कोणत्याही प्रकारचे प्रिस्क्रिप्शन किंवा इतर कोणतीही कागदपत्रे नसताना करण्यात आला.
ही मागणी वैयक्तिक वापरासाठी नसून आलेल्या तक्रारीच्या शंका निरसनासाठी केली होती. त्यानंतर हे औषध ४ जूनला कुरियरद्वारे मिळाली. याबाबत पडताळणी करून गर्भपाताची औषधे ऑनलाइन विक्री करण्याऱ्या दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी तापकीर यांनी केली आहे.










