न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जून २०२१) :- मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथील औद्योगिक वसाहतीतील एसव्हीएस या कंपनीला लागलेल्या भीषण आगीत ८ जणांचा मृत्यू झालाआहे. या कंपनीत सॅनिटायझर बनवण्याचे काम सुरू होते, अशी माहिती समोर आली आहे.
आग लागल्याची माहिती समजताच पोलीस व अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत, आगीवर नियंत्रण मिळवण्यासीठी प्रयत्न सुरू केले आहेत. घटनास्थळी अग्निशामक दलाचे पाच बंब दाखल झाले आहेत. या शिवाय रूग्णवाहिका देखील दाखल झालेली आहे.