- १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थ्यांचे लसीकरण बंद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जून २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरात उद्या (दि. ८) रोजी मंगळवारी ‘कोव्हॉक्सीन’ चा फक्त दुसरा डोस हा वय वर्षे ४५ वरील २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कै. ह.भ.प.प्रभाकरमल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय, नविन भोसरी रुग्णालय, खिवंसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाव, अहिल्याबाईहोळकर सांगवी मनपा शाळा, आचार्य अत्रे सभागृह वाय.सी.एमरुग्णालयाजवळ, नविन जिजामाता रुग्णालय, प्रेमलोक पार्क, दवाखाना, साई अंब्रेला, संभाजीनगर दवाखाना, इ.एस.आय.एस हॉस्पीटल मोहननगर, चिंचवड, प्राथमिक शाळा – ९२, मोरे वस्ती, म्हेञे वस्ती स्केटिंग ग्रांऊड, सेक्टर नं.२१ यमुनानगर, सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरी, सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, मोशी दवाखाना, पि. चि. मनपा शाळा, वाकड, पिंपळे निलख इंगोले मनपा शाळा, पि. निलख दवाखानाजवळ, पिंपळे गुरव माध्यमीक शाळा, कासारवाडी दवाखाना, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, नेहरुनगर उर्दु शाळा, अण्णासाहेब मगर शाळा,पिंपळे सौदागर, पिं. चिं. मनपा. शाळा, पवनानगर, काळेवाडी, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय, चिंचवड, पुणे, मनपा शाळा किवळे, बापुराव ढवळे प्रायमरी स्कुल, पुनावळे या २५ लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत १५० क्षमतेने देण्यात येईल.
तसेच उद्या वय वर्षे ४५ पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थींना ‘कोविशिल्ड’चा पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे (८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत) देण्यात येणार आहे. या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ३९ लसीकरण केंद्रावर १५० लाभार्थींच्या क्षमतेने सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत देण्यात येईल.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दि.०८/०६/२०२१ रोजी सकाळी ९.०० वाजलेनंतर टोकन वाटप करण्यात येईल. नागरिकांनी वेळेआधी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये. तसेच उद्या वय वर्षे १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थींचे लसीकरण करण्यात येणार नाही. त्यामुळे वय वर्षे १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थ्यांनी महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये व याबाबत महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.










