- चौघांना मुद्देमालासह अटक; गुंडा विरोधी पथकाची कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ जून २०२१) :- काळ्या बुरशी या आजारावरील वापरण्यात येणाऱ्या Liposomol Amphoteriein – B Injection या औषधाची विक्री करण्यासाठी काहीजण वाकड येथे येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांना मिळाली. त्यानुसार गुंडा विरोधी पथकाने सापळा लावून चार जणांना अटक केली.
इंजेक्शनचे तीन नग आरोपीकडे मिळून आले. त्यांनी हे औषध काळ्या बाजारात विक्रीसाठी आणले होते. ही घटना वाकड येथे सोमवारी (दि. ७) दुपारी पावणे एक वाजताच्या सुमारास घडली. भाग्यश्री अभिराम यादव (वय ४४, रा. धनकवडी, पुणे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार गौरव जयवंत जगताप (वय ३१, रा. काळाखडक रोड, वाकड), अमोल अशोक मांजरेकर (वय ३९, रा. सूसरोड, पाषाण, पुणे), गणेश काका कोतमे (वय ३२, रा. जनता वसाहत, पुणे) आणि एक महिला आरोपी (वय २४, रा. ज्ञानदीप शाळेजवळ, रुपीनगर, निगडी) या आरोपींना अटक करण्यात आली आहे. बसवराज नावाच्या व्यक्तीवरही गुन्हा दाखल असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.