- पालिकेच्या आठही क्षेत्रीय अधिकाऱ्यांना बांधकाम पाडण्याचे अधिकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ जून २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरात ४८ इमारतींना धोकादायक बांधकाम पाडण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात त्यावर तातडीने कार्यवाही होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्या धोकादायक इमारतीमध्ये राहणारे व आजूबाजूच्या रहिवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
जुन्या इमारती व वाडे सोडण्यास नागरिक तयार होत नाहीत. अनेक इमारतीतील भाडेकरू व मालक यांच्यात वाद असून त्यातील काहीवाद न्यायायलयात अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. धोकादायक बांधकामांबाबत क्षेत्रीय अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी आपत्ती व्यवस्थापनाची बैठक होते. त्यानुसार बैठक होऊन धोकादायक इमारतींना नोटीसा देण्याच्या सूचना आठही क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. शहरातील ४८ धोकादायक इमारतीपैकी २८ इमारती पाडल्या किंवा दुरुस्त केल्या आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.