न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ जून २०२१) :- राज्यातील लॉकडाउनचा कालावधी १५ जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे पिंपरीतील पासपोर्ट कार्यालय १५ जूनपर्यंत बंद राहणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून पासपोर्ट काढण्याची प्रक्रिया शासनाने सुलभ केली आहे.
शासनाने लॉकडाउन १५ जूनपर्यंत वाढवल्याने पिंपरी पासपोर्ट सेवा केंद्र १५ जूनपर्यंत बंद राहणार आहे. आपत्कालीन स्थितीमुळे तत्काळ पासपोर्ट काढाण्यासाठी नागरिकांनी पुणे पासपोर्ट कार्यालयाशी rpo.pune@mea.gov.in या ईमेलवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
















