- स्थापत्य, वाहतूक, क्रिडा व इतर विभागात नियुक्त्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९. जून. २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेचे स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता सतीश इंगळे यांना सहशहर अभियंता म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. इतर कर्मचाऱ्यांनाही पदोन्नती देण्यात आली आहे.
इंगळे यांना सहशहर अभियंता म्हणून पदोन्नतीस अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी नुकतीच मंजुरी दिली आहे. तसेच, स्थापत्य विभागाचे उपअभियंता बापू गायकवाड यांना वाहतूक नियोजन विभागाच्या कार्यकारी अभियंतापदी पदोन्नती देण्यात आली आहे. पदाचा राजीनामा देऊन त्यांनी काही वर्षे महामेट्रोत काम केले होते.
समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले हे निवृत्त झाल्याने त्या पदावर सहायक समाज विकास अधिकारी सुहास बहाद्दरपुरे यांना पदोन्नती देण्यात आली आहे. क्रीडा शिक्षक अशोक पटेकर व आत्माराम महाकाळ यांना क्रीडा पर्यवेक्षक म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. तर, ग्रंथपाल रेखा गवळी यांना ग्रंथालय प्रमुख म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे.