- वेश्या व्यवसायाला प्रवृत्त केल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९. जून. २०२१) :- रहाटणीतील शिवार चौक येथे स्पॉट १८ मॉलमध्ये झिया थाई स्पा मध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी (दि. ८) दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास सेंटरवर छापा मारून कारवाई केली.
पोलिसांनी तीन पीडित महिलांची सुटका केली. तर एजंट महिलेवर गुन्हा दाखल केला. एजंट महिला पीडित महिलांकडून पैशाचे आमिष दाखवून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेत होती.
पोलीस उपनिरीक्षक राजन महाडिक यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वैष्णवी दिपक पवार (वय २७, रा पिंपळे सौदागर) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.