विविध विकास कामांच्या निविदेत झालेल्या ‘रिंग’मुळे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी 360 निविदा रद्द केल्या आहेत. याबाबत बोलताना साने म्हणाले, बो-हाडेवाडीतील आवास योजनेत झालेला भ्रष्टाचार, त्यावरुन होणारी टीका व विरोधकांचे लक्ष विचलित करण्यासाठीच दहा लाख खर्चाच्या निविदा आयुक्तांनी रद्द केल्या आहेत. या सर्व निविदांची चौकशी करावी. या सर्व ठेकेदारांनी ‘रिंग’ केल्याने, त्यांना काळ्या यादीत टाकावे.
पालिकेतील भ्रष्टाचारात नागपूरवरुन आयात केलेले आयुक्त श्रावण हर्डीकर सहभागी आहेत. भ्रष्टाचार कसा करावा, रिंग कशी करायची, याचे प्रशिक्षण आयुक्त देत आहेत, असा हल्लाबोलही त्यांनी केला. तसेच पालिकेत चोरी होत असल्याचे आयुक्तांनी मान्य केले आहे, असेही ते म्हणाले.
पारदर्शक कारभाराची स्वप्न दाखवून शहरवासियांची फसवणूक केली. ज्यांनी ज्यांनी भाजपला मते त्या सर्वांचा भ्रमनिरास भाजपने केला असल्याचे दत्ता साने यांनी न्युज पीसीएमसीशी बोलताना सांगितले.
















