- रिक्षांचे मोठे नुकसान; आरोपीला पोलिसांकडून अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११. जून २०२१) :- वाकडच्या म्हातोबानगर येथे रिक्षा चालक वारंवार बजावून देखील रिक्षा उभी करतात. याशिवाय त्यातील काहीजण त्या ठिकाणी लघुशंका देखील करतात.
याचा राग मनात धरून गुरुवारी मध्यरात्री आरोपीने मद्यपान करून कॉम्प्लेक्स समोर उभा करण्यात आलेल्या रिक्षा दगडाने फोडून नुकसान केले. यात १३ रिक्षांच्या काचा फोडल्या असून वाकड पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
तसेच, कॉम्प्लेक्ससमोर रिक्षा उभ्या केल्या असल्याने आपण स्वतः रिक्षा फोडल्या असल्याची कबुली देखील आरोपी सुरक्षा रक्षक किरण घाडगे याने पोलिसांना दिली आहे.

















