- पिंपरी चिंचवड शहराला अद्यापही वेटिंगच..
- अवघ्या काही फरकाने अन लॉकची संधी हुकली…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११. जून २०२१) :- पुण्यातील मॉल्स आणि दुकानं उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मॉल्सबरोबर दुकानं ७ वाजेपर्यंत, तर रेस्तराँ आणि हॉटेल्स रात्री १० पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.
पिंपरी चिंचवड शहराचा पॉझिटिव्हीटी दर हा पाच टक्क्यांपेक्षा थोडा अधिक असल्याने पिंपरी चिंचवड शहरात पूर्वीचेच निर्बंध जैसे थे राहणार आहेत.
याबाबत पालिका आयुक्त पाटील म्हणाले की, गेल्या एका आठवड्यापासून पुणे शहराचा पॉझिटिव्हीटी दर ५ टक्क्यावर स्थिर आहे. तर पिंपरी चिंचवड शहराचा पॉझिटिव्हीटी दर ५.२ टक्के आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांनी पुणे शहरात निर्बंध शिथिल करतानाच पिंपरी चिंचवड शहरात गत आठवड्याप्रमाणेच येत्या आठवड्यातही निर्बंध लागू केले आहेत.

















