न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११. जून २०२१) :- यंदा आषाढी वारीला जाण्याची परवानगी देण्याची मागणी जोर धरू लागली. वारकऱ्यांबरोबरच भाजपाकडूनही ही मागणी करण्यात आली होती. अखेर मागणीसंदर्भात राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
दहा मानाच्या पालख्यांना परवानगी देण्यात आली असून, त्यासंदर्भातील माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली. संत निवृत्ती महाराज (त्र्यंबकेश्वर), संत ज्ञानेश्वर महाराज (आळंदी), संत सोपान काका महाराज (सासवड), संत मुक्ताबाई (मुक्ताईनगर), संत तुकाराम महाराज (देहू), संत नामदेव महाराज (पंढरपूर), संत एकनाथ महाराज (पैठण), रुक्मिणी माता (कौडानेपूर-अमरावती), संत निळोबाराय (पिंपळनेर-पारनेर, अहमदनगर), संत चांगाटेश्वर महाराज (सासवड) य़ा पालख्यांना परवानगी देण्यात आली आहे.
















