न्युज पीसीएमसी नेटवर्क
देहू (दि. ३१ डिसें.) :- संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी देहूगाव येथे गेलेल्या तरुणीचा तीन जणांनी विनयभंग केला. ही घटना शुक्रवार (दि. २८) रोजी दुपारी एकच्या सुमारास संत तुकाराम महाराज मंदिर, देहूगाव येथे घडली.
याप्रकरणी २१ वर्षीय तरुणीने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार चक्रधर धनंजय काळोखे, अक्षय कैलास काळोखे, गणेश दिलीप काळोखे (सर्व रा. देहूगाव, ता. हवेली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी तरुणी संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी देहूगाव येथील संत तुकाराम महाराज मंदिरात गेल्या होत्या. देवदर्शन करताना त्यांना त्यांच्या मैत्रिणीचा फोन आल्याने त्या मंदिरामागे असलेल्या इंद्रायणी नदीच्या तीरावर फोनवर बोलत थांबल्या होत्या. त्यावेळी आरोपी तिथे आले. त्यांनी फिर्यादी यांच्याशी बोलायचे असल्याचे सांगितले. मात्र तिने नकार दिला. त्यावर आरोपींनी तिला अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तसेच शेरेबाजी करीत मारहाण देखील केली.











