न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. ३१ डिसें.) :- पिंपळे सौदागर येथील व्ही. एच. बी. पी. पांडुरंग काटे प्रतिष्ठान संचलित पी. के. इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये क्रीडा सप्ताहास सुरुवात झाली आहे. त्याचा उद्घाटन समारंभ फुटबॉलचा राष्ट्रीय खेळाडू प्रशांत घाडगे व हॉकीचा आंतरराष्ट्रीय खेळाडू अभिजित शिरसाठ यांच्या हस्ते करण्यात आले.
क्रीडा सप्ताहास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शाळेचे संस्थापक जगन्नाथ काटे यांनी विद्यार्थ्यांना खेळाविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमाबरोबरच खेळही महत्त्वाचे आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांच्यातील कलागुण व कल पाहूनच खेळाची निवड करावी. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना त्यात प्राविण्य मिळविण्यासाठी प्रोत्साहन द्यावे तसेच त्याचा आहार देखील सात्विक असावा. त्यात फास्टफूडचा समावेश नसावा, असे त्यांनी सांगितले.
शाळेच्या मुख्याध्यापिका दीपाली जुगुळकर, पर्यवेक्षिका संगीता पराळे, सविता आंबेकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन दीप्ती आमले व कीर्ती कान्हेरे यांनी केले.












