न्युज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. ३१ डिसें.) :- मुंबई उच्च न्यायालयाने पुण्यातील सभेला परवानगी नाकारल्याने चंद्रशेखर आझाद यांनी साध्या पध्द्तीने महात्मा फुले वाड्यात येऊन अभिवादन केले. त्यानंतर लाल महालाला भेट देऊन पत्रकारांशी संवाद साधला
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना चंद्रशेखर आझाद म्हणाले की, भाजपसहित पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१९ ला सत्तेवर पुन्हा निवडणून येणार नाहीत. नरेंद्र मोदी पून्हा पंतप्रधान होऊ शकणार नाहीत. मी ज्या राज्यात जातो त्या राज्यातील भाजपचे सरकार जाते. म्हणून महाराष्ट्रातूनही भाजप सरकार हद्दपार होणार आहे.
मी उद्या भीमा कोरेगावला जाणार असून, मला तिथं जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. नजरकैदेत ठेवण्याच्या सरकारच्या कृतीवर त्यांनी बोचरी टीका केली आहे. मला नजर कैदेत ठेवायला मी काय दहशतवादी आहे? असा टोला त्यांनी राज्य सरकारला लगावला असून, भीमा कोरेगाव येथे दंगल भडकवणारे संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे खुले आम फिरत असून, मला मात्र रोखण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे आझाद म्हणाले.










