न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ जाने.) :- ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. ८१ वर्षीय कादर खान यांच्यावर कॅनडा इथं उपचार सुरू होते. कादर खान यांना प्रोग्रेसिव सुप्रान्यूक्लियर पाल्सी डिसऑर्डर हा आजार होता. २०१५ मध्ये आलेला ‘दिमाग का दही’ हा कादर खान यांचा अखेरचा सिनेमा ठरला.
कादर खान जसे अभिनेते होते, त्याचप्रमाणे ते क्रांतिकारी विचारवंतही होते. त्यांच्यातला क्रांतिकारी जागा होऊन त्यांनी साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर “इंन्कालाबी नेता” हे पुस्तक लिहिले होते. अशा या क्रांतिकारी विचारवंताला शिवसेना व शिवशाही व्यापारीसंघ तसेच लहुजी शक्तीसेना पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने लहुश्री युवराज दाखले यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.










