न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ जाने.) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेची स्थायी समितीची नियोजित सभा मंगळवार (दि. ०१) रोजी होणार होती. ही नियोजित बैठक गणसंख्येअभावी पून्हा तहकूब करण्यात आली आहे.
स्थायी समितीच्या सभापती ममता गायकवाड यांच्या उपस्थितीत अभिनेते कादर खान आणि नगरसेवक बाबू नायर यांचे वडील एम. शंकरनारायणन नायर यांना श्रद्धांजली वाहून पुढील सभा शुक्रवार (दि. ४) रोजी दुपारी दीड वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
उर्वरित सदस्य बैठकीला गैरहजर राहिल्याने ही बैठक येत्या ४ जानेवारीपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली आहे. परंतु, स्थायीच्या सदस्यांनी सभेला पून्हा दांडी मारल्याने सभा तहकूब झाली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात ऊलट सूलट चर्चा रंगली आहे.
महापालिकेच्या स्थायी समिती विषयपत्रिकेवर पंतप्रधान आवास योजनेच्या आकुर्डी, पिंपरीतील गृहप्रकल्प ( सुमारे ८४ कोटी), यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील पदव्युत्तर अभ्यासाक्रमासाठी आवश्यक कामे करणे ( सुमारे ३२ कोटी), च-होली येथील चोविसवाडी, वडमुखवाडी १८ मीटर रस्ता विकसित करणे (१९ कोटी ७२ लाख रुपये), विशालनगर जगताप डेअरी ते मुळा नदीवरील पुला पर्यंतचा २४ मीटर रुंद रस्ता अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार विकसित करणे व आदी दोनशे कोटीच्या आसपास विषय स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवण्यात आलेले आहेत.










