न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ जाने.) :- राज्य शासनाच्या गोवर रुबेला लसीकरण मोहीम पिंपरी-चिंचवड महापलिकेच्या वैद्यकिय विभागातर्फे राबविण्यात येत आहे. सध्या शहरात १२०० ठिकाणी मोहीम सुरु असून, या मोहिमेतंर्गत सहा लाख सोळा हजार एकशे त्र्याण्णव एवढे उद्दिष्ट आहे. यापैकी,चार लाख चौतीस हजार दोनशे चौतीस एवढे उद्दिष्ट पूर्ण झाल्याची माहिती, आरोग्य विभागाने दिली आहे.
या मोहिमेसाठी अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांचे अध्यक्षतेखाली टास्क फोर्स समितीची सभा आयोजित केली होती. यावेळी अतिरिक्त आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकिय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, डॉ. तृप्ती सांगळे, शिक्षणाधिकारी पराग मुंढे, प्रभारी वैद्यकिय अधिकारी रुग्णालय डॉ. शैलजा भावसार, डॉ. एस. एम. शिंदे, डॉ. पी. एच. ताडे, डॉ. संगिता तिरुमणी, डॉ. विणादेवी गंभीर, डॉ. सुनिता इंजिनिअर, शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. बिपीन डिंबळे आदी उपस्थित होते.
गोवर रुबेला लसीकरण मोहिम २७ नोव्हेंबर २०१८ पासून राबविण्यात येत आहे. गोवर रुबेला लसीकरण मोहिमेत लाभार्थी ९ महिने ते १५ वर्ष वयोगटातील सर्व बालके व विद्यार्थी येतात. या वयोगटातील जास्तीत जास्त बालक व विद्यार्थ्यांपर्यत सर्व महापालिका व खासगी शाळा, अंगणवाडी, बालवाडी, नर्सरी, प्ले ग्रुप मार्फत मोहिमेपर्यत पोहचणे शक्य होत आहे. यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व मनपा व खासगी शाळांमध्ये लसीकरण मोहीम सुरु आहे.
राज्य शासनाच्या मोहिमेत महापालिकेस लसीकरण उद्दिष्ट्य पुर्ण करण्यासाठी आयुक्त व अतिरिक्त आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेचे विविध विभाग, वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी, माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभाग, एकात्मिक बाल विकास प्रकल्प, आशा स्वयंसेविका आदींचे सहकार्य मिळत आहे.










