न्युज पीसीएमसी नेटवर्क
रावेत (दि. १ जाने.) :- संस्कार सोशल फाउंडेशन पिंपरी चिंचवड संचलित रावेत येथील संस्कार अनाथ आश्रमाच्या वतीने दूध प्राशन करून नवीन वर्षाचे स्वागत केले.
यावेळी माजी नगरसेवक सुजीत पाटील, संस्कार सोशलचे अध्यक्ष बाळकृष्ण खंडागळे, सूर्यकांत खंडागळे, विजय मालुसरे, दिलीप भोसले, सोमनाथ लोटके, जगदीश देशपांडे, विजय जांभेकर, रमेश मालुसरे, यशराज खंडागळे आदी उपस्थित होते.
अध्यक्ष खंडागळे म्हणाले की, २००९ पासून फाउंडेशन अंतर्गत व्यसनमुक्ती केंद्र चालवले जाते. दरवर्षी “दूध प्या निरोगी रहा” असा संदेश देत नवीन वर्ष स्वागत केले जाते. तसेच येणाऱ्या नागरिकांना भोजनाची व्यवस्था केली जाते. यावेळी सुमारे तीनशे पन्नास नागरिक सहभागी झाले होते.










