न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जून २०२१) :- आरोपी हा विवाहित असून ही बाब त्याने लपवून ठेवली. लग्न झाले असल्याचे तरुणीला सांगितले नाही. तरुणी नोकरी करीत असून, निगडी येथील एका ढोल-ताशा पथकात वादनाच्या सरावासाठी जात होती. त्यावेळी आरोपी व तिची ओळख झाली. तू मला खूप आवडते, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी तुझ्यासोबत मैत्री करण्यास तयार आहे. तुझी इच्छा आहे का? असे विचारून तिचा विश्वास संपादन केला.
तरुणीने मैत्रीस होकार दिला. मी तुझ्याशी लग्न करणार आहे, असे आमिष दाखवून तरुणीला जबरदस्तीने त्याच्या चारचाकी वाहनातून रावेत परिसरातील हॉटेलमध्ये जेवणासाठी घेऊन गेला. त्यानंतर मुकाई चौक ते भोंडवे चौक दरम्यान अंधारात त्याची चारचाकी थांबवली. त्यावेळी शिंदे याने तरुणीवर जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतर खेड तालुक्यातील राजगुरुनगर परिसरात एका फार्म हाऊसवर वारंवार घेऊन गेला. तेथे तिच्या कपाळावर कुंकू लावला. तू माझी बायको आहेस, असे सांगून वेळोवेळी नैसर्गिक व अनैसर्गिक संबंध ठेवून फिर्यादी महिलेवर अत्याचार केला.
२९ वर्षीय तरुणीने याप्रकरणी मंगळवारी फिर्याद दिली आहे. संदीप मनोहर शिंदे (वय ३७, रा. राजे शिवाजी नगर,) असे आरोपीचे नाव आहे. बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येऊन तो गुन्हा देहूरोड पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.


















