- भोसरीतील घटना; वनविभागाकडून गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जून २०२१) :- मांडूळ जातीचा सरपटणारा प्राणी विनापरवाना विक्रीसाठी स्वतःजवळ बाळगला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार कारवाई करून एकाला पकडले. त्याच्याकडे १५ लाख रुपये किंमतीचे मांडूळ मिळून आले.
इंद्रायणीनगर भोसरी येथे मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. वनविभागाचे वनरक्षक असलेले सुरेश काशिनाथ बरले (वय ३०, रा. भांबुर्डा, गोखले नगर, पुणे) यांनी या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. योगेश मारेआप्प म्हेत्रे (वय २१, रा. आनंद नगर, चिंचवड), असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.
















