- निगडी प्राधिकरणातील घटना; रोकड, दागिने लंपास…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५. जून. २०२१) :- मुलाला भेटण्यासाठी हैदराबाद येथे फिर्यादी गेले होते. त्यावेळी त्यांचा बंगला कुलूप लावून बंद होता. मंगळवारी (दि. २२) रात्री बारा ते बुधवारी (दि. २३) सकाळी सात वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांच्या बंगल्याचा पाठीमागील दरवाजा तोडला.
बंगल्यात प्रवेश करून लाकडी कपाटाचे लॅच लाॅक तोडून त्यातून ९७ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि इतर वस्तू चोरून नेल्या. ही घटना निगडी प्राधिकरण मधील सेक्टर क्रमांक २८ येथे उघडकीस आली.
दीपक बळीराम हंबीर (वय ७०, रा. सुमती बंगला, सेक्टर क्रमांक २८, प्राधिकरण निगडी) यांनी याबाबत गुरुवारी (दि. २४) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.
















