- सोमवारपासून शहरातील दुकाने सात ते दुपारी चार वाजेपर्यंतच सुरू राहणार..
- निर्बंध व सवलतीच्या माहितीसाठी वाचा….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६. जून. २०२१) :- करोनाबाधित रुग्णांची वाढणारी संख्या आणि करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेने राज्य सरकारने निर्बंध शिथिलतेच्या नियमावलीत बदल केला आहे. पिंपरी चिंचवड शहराचा समावेश तिसऱ्या गटात केला आहे.
त्यानुसार सोमवार (दि. २८) पासून शहरातील दुकाने सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंतच सुरू राहतील, तर, हॉटेल आणि रेस्टॉरंट दुपारी चार वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने आणि त्यानंतर रात्री ११ वाजेपर्यंत फक्त पार्सल सेवा सुरू राहील, मॉल बंद राहतील, असा आदेश पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी आज शनिवारी (दि. २६) रोजी पारित केला आहे.
१ अत्यावश्यक सेवा ( Essential Category ) यामध्ये खालील सेवांचा समावेश असेल.
• रुग्णालये, डायग्नोस्टिक सेंटर, क्लिनिक्स, लसीकरण ( Vaccination ), वैद्यकीय विमा कार्यालय, फार्मासीज व फार्मासिटीकल कंपनी, इतर वैद्यकीय व आरोग्य सेवा, त्यास सहाय्य करणारे उत्पादन व वितरण युनिट ( Supporting Manufactruring and Distribution Units ) तसेच त्यांचे डिलर्स, वाहतूक व पुरवठा करणा-या आस्थापना, लस, सॅनिटायझर, मास्क, वैद्यकीय साहित्य व उपकरणे, कच्चा माल उत्पादन व पुरवठा करणारे व त्यांच्याशी निगडीत सर्व सेवा
• पशुवैद्यकीय दवाखाने, पाळीव प्राणी संगोपन केंद्र, पाळीव प्राणी खाद्याची दुकाने ( Pet Shops )
• वन विभागाने घोषित केल्यानुसार वनीकरणाशी संबंधित कामे
• किराणा ( Groceries ), भाजीपाला, फळविक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई व सर्व प्रकारची खाद्यपदार्थांची दुकाने, मटन, चिकन, अंडी, मासे विक्रीची दुकाने.
• शीतगृह आणि गोदाम सेवा ( Cold Storage and Warehousing )
• सार्वजनिक वाहतूक – टॅक्सी, रिक्षा, रेल्वे, विमान सेवा, सार्वजनिक बस
• पुर्व पावसाळी नियोजित कामे
• स्थानिक प्राधिकरणाद्वारे पुरविण्यात येणा-या सार्वजनिक सेवा.
• रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि त्यांनी अत्यावश्यक सेवा म्हणीन घोषित केलेल्या सेवा
• दूरसंचार सेवा आणि त्यांच्याशी निगडीत देखभाल व दुरुस्ती सेवा.
• मालवाहतूक
• पाणीपुरवठा सेवा
• कृषी संबंधित सेवा आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना ( बियाणे, खते, उपकरणे व त्यांच्याशी निगडीत देखभाल व दुरुस्ती सेवा.
• सर्व प्रकारचे आयात – निर्यात
• ई – कॉमर्स ( अत्यावश्यक सेवेतील वस्तू व सेवांच्या पुरवठ्यासाठी )
• मान्यताप्राप्त मिडिया.
• पेट्रोलपंप आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादने पुरविणा-या सेवा ( including offshore / onshore production )
• सर्व प्रकारच्या कार्गो / कुरियर सेवा
• डेटा सेंटर / क्लाऊड सर्व्हिसेस / माहिती व तंत्रज्ञान यांचेशी संबंधित पायाभूत सुविधा आणि सेवा.
• शासकीय व खाजगी सुरक्षा सेवा.
• विद्युत व गॅस वितरण सेवा.
• ATMs
• पोस्टल सेवा.
• कस्टम हाऊस एजंट, लस / औषधे / जीवन रक्षक औषधांची संबंधित वाहतूक करणारी अधिकृत परवाना धारक मल्टीमॉडेल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर
• कोणत्याही अत्यावश्यक सेवांसाठी कच्चा माल, पॅकेजिंग साहित्याची निर्मिती करणा-या / पुरवठा करणा-या सेवा.
• पावसाळयाच्या हंगामाकरीता नागरिक अथवा संस्थांसाठी साहित्याची निर्मिती करणा-या सेवा.
• आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे घोषित अत्यावश्यक सेवा.
२) सूट देण्यात येत असलेल्या आस्थापना / सेवा ( Exemption Category )
अ) कार्यालये
पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील खालील कार्यालये सुरु राहतील.
केंद्र, राज्य, स्थानिक स्वराज्य संस्था यांची कार्यालये ( Including Statutory Authorities and organisations )
को – ऑपरेटीव्ह बँका, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी बँका
अत्यावश्यक सेवा पुरवठा करणा-या कंपन्यांची कार्यालये
विमा / मेडीक्लेम कंपनी
औषध उत्पादन करणा-या आस्थापना व त्यासाठी लागणारे साधन सामग्री उत्पादक तसेच त्यांच्याशी संबंधित कार्यालये.
रिझर्व बँकेच्या नियंत्रणाखालील संस्था ( Standalone Primary dealers, CCIL, NPCI, पेमेंट सिस्टीम ऑपरेटर आणि रिझर्व बँकेने नियमित केलेल्या बाजार पेठेतील कार्यरत वित्तीय बाजारातील सहभागीसह घातक व मध्यस्थी
सर्व नॉन – बँकिंग वित्तीय महामंडळे.
सर्व मायक्रो फायनान्स संस्था
वकील, सी. ए. यांची कार्यालये, वित्तीय संस्थेशी संबंधित कार्यालये.
३) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा ( Essential Category ) मधील नमूद दुकाने ही आठवड्यातील सर्व दिवस दुपारी ४.०० वाजेपर्यंत सुरु राहतील.
४) अत्यावश्यक दुकाना व्यतिरिक्त ( Non – Essential Category ) इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी ४.०० वाजेपर्यंत सुरु राहतील, शनिवार व रविवार पूर्णतः बंद राहतील.
५) मॉल, सिनेमागृह ( Single screen and multiplex ) नाट्यगृह संपूर्णतः बंद राहतील.
६) रेस्टॉरंट, बार, फूड कोर्ट हे सोमवार ते शुक्रवार दुपारी ४.०० वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या ५०% क्षमतेने सुरुराहतील. दुपारी ४.०० नंतर तसेच शनिवार व रविवार फक्त घरपोच सेवा ( Home Delivery ) रात्री ११.०० वाजेपर्यंत सुरु राहतील. ( प्रत्यक्ष जाऊन पार्सल घेणे ( take away ) बंद राहील ).सर्व रेस्टॉरंट, बार, फूड कोर्ट इ. यांना दर्शनी भागावर बाहेरील बाजूस एकूण आसनक्षमता आणि ५०% प्रमाणे परवानगी असलेलीआसनक्षमता यांचा बोर्ड लावणे तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने दिलेल्यासुचनांचेस्टीकर्स लावणे बंधनकारक असेल.
७) लोकल ट्रेन मधून फक्त वैद्यकीय सेवेसाठी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व महिलांसाठी, शासकीय कर्मचारी यांच्या कर्मचा-यांना प्रवासकरणेस परवानगी राहील.
८) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक ठिकाणे ( उद्याने ), खुली मैदाने, चालणे व सायकलिंगआठवड्यातील सर्व दिवस फक्त सकाळी ०५.०० ते सकाळी ०९.०० वाजेपर्यंत सुरु राहतील.
९) सूट देण्यात आलेल्या आस्थापना / सेवा ( Exemption Category ) व्यतिरिक्त सर्व खाजगी कार्यालये कामाचे दिवशी ( Working Days ) ५०% कर्मचारी क्षमतेने दुपारी ०४.०० वाजेपर्यंत सुरु राहतील.
१०) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा व कोविड १९ व्यवस्थापनाशी संबंधित शासकीय कार्यालये ( Goverment offices and Emergency services required for Covid 19 management ) १००% क्षमतेने सुरु राहतील. शासकीय कार्यालये (अत्यावश्यक / कोरोना विषयक कामकाज करणा-या कार्यालयां व्यतिरिक्त) ५०% अधिकारी / कर्मचारी उपस्थितीत सुरु राहतील. उपरोक्त कार्यालये / आस्थापना यांना यापेक्षा जास्त कर्मचारी उपस्थित असणे आवश्यक असल्यास संबंधितआस्थापना प्रमुख यांनी आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांची परवानगी घ्यावी.
११) सर्व आउटडोअर स्पोर्ट ( outdoor games ) सर्व दिवशी फक्त सकाळी ०५.०० ते ०९.०० या वेळेत सुरु राहतील. (सायंकाळी बंद राहतील.)
१२) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात जेथे चित्रीकरणाच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था आहे अशा ठिकाणीचित्रीकरण ( Shooting ) करण्यास परवानगी राहील. चित्रिकरणा संबंधित कर्मचा-यांना जवळच्या ठिकाणीराहण्याची व्यवस्था असल्यास ( Dedicated Colony ) तसेच त्या ठिकाणाहून स्वतंत्र वाहनाने ने – आण करण्याची व्यवस्था असल्यास चित्रीकरण करण्यास परवानगी असेल. मात्र सायंकाळी ०५.०० नंतरचित्रीकरणाच्या ठिकाणाहून बाहेर प्रवास करता येणार नाही.
१३) सामाजिक, धार्मिक कार्यक्रम व मनोरंजन कार्यक्रम यास ५० लोकांच्या उपस्थितीत फक्त सोमवार ते शुक्रवार दुपारी ०४.०० वाजेपर्यंत परवानगी राहील.
उपरोक्त कार्यक्रमाचा कालावधी हा ०३ तासापेक्षा जास्त असू नये.
सदर ठिकाणी खाद्यपदार्थांचे सेवन करण्यास प्रतिबंध राहील.
सदर कार्यक्रमात Covid Appropriate Behaviour (CAB) चे पालन करावे.
आदेशाचे पालन न करणा-या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करावी. तसेच वारंवार नियमांचा भंग झाल्यास सदर आस्थापनाचे परवाना रद्द करणेअथवा मे. केंद्र शासन कोविड १९ आपत्ती संपूर्णपणे संपली असे घोषित करेल त्या दिवसापर्यंत संबंधित आस्थापना बंद करण्यात येतील.
१४) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व धार्मिक स्थळे नागरिकांसाठी पूर्णपणे बंद राहतील. सदर ठिकाणी मंदिराच्या आवारात राहणा-या कर्मचा-यांमार्फत दैनंदिन पूजा / अर्चना करण्याकरिता परवानगी राहील.
१५) लग्न समारंभ कार्यक्रम जास्तीत जास्त ५० लोकांच्या उपस्थितीत करणेस परवानगी राहील. मे. शासनाने निर्गमित केलेल्या आदेशातील अटी / मार्गदर्शक सुचनांनुसार धार्मिक स्थळी विवाह संबंधित कार्यक्रम मर्यादित लोकांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी राहील.
१६) अंत्यसंस्कार, दशक्रिया विधी व त्यांच्याशी निगडीत कार्यक्रम जास्तीत जास्त २० लोकांच्या उपस्थितीतकरणेस परवानगी राहील.
१७) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील ज्या बांधकामांच्या ठिकाणी कामगारांची राहण्याची व्यवस्थाआहेअसे बांधकाम सुरु ठेवता येतील. तथापि, बाहेरून येणारे कामगार असल्यास तसे बांधकाम दुपारी ०४.००वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवनगी राहील. मात्र बाहेरून येणारे कर्मचारी हे दुपारी ०४.०० वाजता तेथून घरी जाण्यासाठी बाहेर पडतील.
१८) कृषी संबंधित दुकाने आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना( बी – बियाणे. खते, उपकरणे व त्यांच्याशीनिगडीत देखभाल व दुरुस्ती सेवा इत्यादी ) तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती मधील शेतमालाची विक्रीकरणारे दुकाने / गाळे हे आठवड्यातील सर्व दिवस दुपारी ०४.०० वाजेपर्यंत सुरु राहतील
१९) ई – कॉमर्स सेवांना सर्व वस्तू व सेवा यांचा पुरवठा करण्याकरिता परवानगी राहील.
२०) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास(जमावबंदी ) प्रतिबंध राहील तसेच सायंकाळी ०५.०० नंतर कलम १४४ ( संचारबंदी) लागू करण्यात येत आहे.
२१) व्यायामशाळा ( Gym ), सलून, ब्युटी पार्लर, स्पा, wellness centers आसन क्षमतेच्या ५०% क्षमतेनेपूर्व नियोजित वेळेनुसार ( by appointment) सोमवार ते शुक्रवार दुपारी ०४.०० वाजेपर्यंत सुरु राहतील. (शनिवार व रविवार संपूर्णतः बंद राहतील) मात्र सदर ठिकाणी वातानुकुलन ( A. C. ) सुविधा वापरता येणार नाही.
२२) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ( PMPML ) आसन क्षमतेच्या ५०% क्षमतेने ( without standing ) सुरु राहतील. अत्यावश्यक सेवेशी निगडीत व्यक्तींनाच त्यातून प्रवास करता येईल.
२३) माल वाहतूक करणा-या वाहनांना व त्यामध्ये जास्तीत जास्त ३ व्यक्ती ( चालक + क्लीनर / मदतनीस ) यांना इतर प्रवाश्यांना लागू असलेल्या नियमानुसार प्रवास करणेस परवानगी राहील.
२४) खाजगी वाहनातून, बसेस तसेच लाब अंतराच्या रेल्वे मधूनआंतर जिल्हा प्रवास करण्यास परवानगी राहील.मात्र सदर वाहनाने शासनाने घोषित केलेल्या लेवल ५ मधील ठिकाणी थांबणार असतील तर e-pass असणे बंधनकारक राहील. अशावेळी वाहनामधून प्रवास करणा-या प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतंत्र e-pass आवश्यक राहील.
२५) निर्यातपुर्वक उद्योग / Export oriented units (including MSMEs that need to fulfill export obligation) मधील उत्पादन नियमितपणे सुरु राहील.
२६) खालीलउत्पादनक्षेत्र/उद्योग नियमितपणे सुरु राहतील.
अ) अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन करणारे उद्योग (Essential goods manufacturing units) -(अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या उद्योगांना लागणारा कच्चा माल उत्पादन करणरेयुनिट,त्याची पॅकेजिंग करणारे युनिट आणि संपुर्ण पुरवठा साखळी यासह).
ब) सतत प्रक्रिया करणारे उद्योग (All continuous process industries ) – ( Unites that requireprocess that are of such a nature that these cannot be stopped immediately and cannot restart without considerable time requirement )
क)राष्ट्रीय सुरक्षा व संरक्षणाशी संबधित उत्पादन करणारे उद्योग. ( Manufacturing of items thatare significant to National Security and Defence )
ड) Data Centers/Cloud Service providers/ IT Services supporting criticalInfrastructure and services.
२७ ) उपरोक्त मुद्दा क्र. २५ व २६ येथे नमूद केलेल्या उद्योगांव्यतिरिक्त इतर सर्व उत्पादन क्षेत्र हे ५०% कर्मचारी क्षमतेने सुरु राहतील. कर्मचारी ने-आण करण्यासाठी संबधित उद्योगांनी स्वतंत्र वाहतूक व्यवस्था करावी. सदर कर्मचा-यांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून प्रवास करता येणार नाही.
२८) उपरोक्त आदेशामध्ये परवानगी देण्यात आलेल्या ज्या आस्थापना दुपारी ०४.०० वाजेपर्यंत सुरु राहतीलत्या ठिकाणी काम करणारे कर्मचारी तसेच त्या ठिकाणावरुन सेवा घेणारे नागरिक यांनीसायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत त्यांचे घरी पोहचणे अपेक्षित आहे.
२९) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था यांचे नियमित वर्ग दिनांक १५ जुलै २०२१ पर्यंत पुर्णत: बंद राहतील. सर्व प्रकारचे कोचिंग क्लासेस, प्रशिक्षण संस्था पूर्णतः बंद राहतील. मात्र ऑनलाईन शिक्षणास मुभा राहील. मात्र कोविड १९ चे व्यवस्थापनाकरिता वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत Skill Development प्रशिक्षण कोर्सेस सुरु राहतील. त्यांनी Covid Appropriate Behaviour (CAB) चे पालन करावे.
३०) मद्यविक्रीची दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी ०४.०० वाजेपर्यंत सुरु राहतील. शनिवार व रविवार फक्त घरपोच सुविधा ( Home Delivery ) सुरु राहील.
३१) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील दुकाने, बाजार, कंपनी, फॅक्टरी, बांधकाम स्थळ (Construction Site), हॉटेल, रेस्टॉरंट, बार, फूड कोर्ट इ. ठिकाणी काम करणा-या कामगार व इतर व्यक्तींची रॅपिड अँटिजेन चाचणी ( RAT ) प्रत्येक पंधरा दिवसांनीकरणे बंधनकारक राहील. स्थानिक क्षेत्रिय अधिकारी यांनी त्यांचे क्षेत्रामध्ये ठिकठिकाणी वैद्यकीय विभागाच्या मदतीने याची अंमलबजावणी करावी.
३२) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिक, विक्रेते, व्यापारी, कामगार इत्यादी सर्व लोकांनी मास्क न वापरल्यास किंवा कोविड १९ प्रोटोकॉल विरोधी वर्तन केल्यास ( उदा. थुंकणे, योग्य अंतर न पाळणेइत्यादी ) त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयांतर्गत प्रत्येकी १० भरारी पथके, २० कोविड मार्शल पथके यांच्यामार्फत कारवाई करण्यात यावी. कोविड १९ नियमांची कडक अंमलबजावणी करणेकामी क्षेत्रिय अधिकारी यांचे सुचनेनुसार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी / कर्मचारी यांनी लग्न समारंभ, सामाजिक, धार्मिक कार्यक्रम व मनोरंजन कार्यक्रम तसेच गर्दी करणारी ठिकाणे (हॉटेल, रेस्टॉरंट, मंगल कार्यालय इ.) या ठिकाणी कडक कारवाई करणेकामी सहभाग घ्यावा. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संबंधित भरारी पथकातील कोविड मार्शल / पोलीस यांना दंडात्मक कारवाई करणेकामी प्राधिकृत केले आहे.
कोविड १९ च्या प्रतिबंधासाठी केंद्र सरकार / राज्य शासन आणि या कार्यालयाद्वारे वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांचे, मार्गदर्शक सुचनांचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ते ६० तसेच भारतीय दंड संहितेचे कलम १८८ नुसार, अन्य कायदेशीर तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहील, असे आदेशात आयुक्तांनी म्हटले आहे.
















