- भाजच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह..
- मुंडेंसह आ. लांडगे व कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६. जून. २०२१) :- ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठी भाजपच्या वतीने पिंपरी चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सहभागी झालेल्या माजी मंत्री व भाजप च्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे, आमदार माधुरी मिसाळ यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पिंपरी पोलिस स्टेशनला नेल्यानंतर सर्व आंदोलकांची सुटका करण्यात आली.
राज्यातील ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी भाजपच्या वतीने शनिवारी (दि. २६) राज्यभर आंदोलन करण्यात आले. पिंपरीत केलेल्या चक्काजाम आंदोलनाचे नेतृत्व भाजपच्या राष्ट्रीय सचिव व माजी मंत्री पंकजा मुंडे व शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी केले. यावेळी आमदार लक्षमण जगताप यांनी आंदोलकांची भेट घेतली. पंकजा मुंडे या आंदोलनात सहभागी झाल्याने, भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता.
या आंदोलनात महापौर माई ढोरे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी मंत्री दिलीप कांबळे, माजी आमदार मेधा कुलकर्णी, जगदीश मुळीक, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या आंदोलनात ओबीसी आरक्षणाच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या.’राज्य शासनाची खेळी, ओबीसी आरक्षणाचा बळी’, ‘ओबीसी के सन्मान मे, भाजप मैदान मे ‘ , ‘ऊठ ओबीसी जागा हो, एकजुटीचा धागा हो’ अशा घोषणां देण्यात आल्या.
















