- नगर अर्बन बँकेतील २२ कोटींचे कर्ज अपहार प्रकरण..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६. जून. २०२१) :- नगर अर्बन बँकेच्या चिंचवड शाखेत झालेल्या करण्यात आली. न्यायालयाने त्यांना ३० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.
डॉ. भास्कर सिनारे, डॉ. रवींद्र कवडे व डॉ. विनोद श्रीखंडे, अशी अटक झालेल्या तिघा डॉक्टरांची नावे आहेत. बँकेची फसवणूक करून घेतलेल्या कर्जाच्या रकमेतील सहा कोटी चार लाख रुपये या तिघा डॉक्टरांच्या खात्यावर वर्ग झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
नगर अर्बन बँकेच्या चिंचवड शाखेचे व्यवस्थापक महादेव साळवे यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात २५ जानेवारी २०२१ रोजी फिर्याद दिली होती. त्यानुसार बबन निवृत्ती चव्हाण, वंदना बबन चव्हाण, यज्ञेश बबन चव्हाण, मंजूदेवी हरिओम प्रसाद, रामचंद्र अण्णासाहेब तांबिले, अभिजित नाथा घुले यांच्यासह कर्ज उपसमिती सदस्य व बँकेच्या संचालकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
















