- सोसायटी चेअरमन ॲड. विकास जाधव यांचा पुढाकर..
- स्व-आयोजन करणारी शहरातील पहिलीच गृहनिर्माण संस्था…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९. जून. २०२१) :- कोरोनावर मात करण्यासाठी मोशी प्राधिकरण येथील ‘एल ॲक्सिस’ या गृहनिर्माण संस्थेने सोसायटीतील सदस्यांसाठी कोविड लसीकरण शिबीराच रविवारी (दि. २७) रोजी आयोजन केल होतं. या उपक्रमात सोसायटीतील महिला व पुरुष अशा एकूण २०१ सभासदांनी लसीकरणाचा लाभ घेतला. असा उपक्रम राबविणारी पिंपरी चिंचवड शहरातील ही पहिलीच सोसायटी ठरली.
पुण्यातील डॉ. शशांक शहा संचलित लॅप्रो ओबेसो सेंटरच्या सहकार्यातून हे शिबीर घेतलं. कोविड शिबीर यशस्वी करण्यासाठी ‘एल ॲक्सिस’ सोसायटीचे चेअरमन ॲड. विकास जाधव, सागर घोलप, सागर औटी, निलेश काळपांडे, महंतेश चोपडे, गणेश ढवळे, समीर गावडे, मनीष शिर्के, दिपक गावडे आदींनी परिश्रम घेतले.
ॲड. विकास जाधव माहिती देताना म्हणाले, भविष्यात कोविडच्या तिसऱ्या लाटेची तज्ञांकडून भीती वर्तविली जात आहे. या लाटेपासुन सुरक्षित राहण्याकरिता ‘मी माझी सोसायटी सुरक्षित केली; तुम्ही तुमची सोसायटी सुरक्षित करा’ या उपक्रमांतर्गत ‘एल ॲक्सिस’ सोसायटीत कोविड शिबीराच आयोजन केलं. या शिबिरात दोनशेपेक्षा अधिक जणांना कोविडच्या ‘कोविशिल्ड’ या लसीचा डोस देण्यात आला. यावेळी पालिकेच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले.
















