- १ जुलैपासून कागदपत्रांची तपासणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९. जून. २०२१) :- पिंपरी – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून पेठ क्रमांक १२ मध्ये उभारण्यात येत असलेल्या गृहप्रकल्पासाठी गुरुवारपासून (दि. १ जुलै) कागदपत्र तपासणी सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी एकूण ४० दिवसांचा कार्यक्रम निश्चित केला आहे.
पहिल्या टप्प्यात दिव्यांगांची कागदपत्रे तपासली जाणार आहेत. प्राधिकरणाकडून पेठ क्रमांक १२ मधील गृहप्रकल्पासाठी निश्चित केलेल्या लाभार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला व इतर कागदपत्रे गोळा करण्यासाठी महिनाभराची मुदत देण्यात आली होती. ही मुदत बुधवारी संपत आहे.
दरम्यान, गुरुवारपासून प्राधिकरणाच्या टिळक चौकातील जुन्या कार्यालयात सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत कागदपत्र तपासण्याची कार्यवाही होणार आहे. कागदपत्र तपासणी झाल्यानंतर लाभार्थ्यांकडून ८० टक्के रकम भरून घेतली जाणार आहे.
















