- पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९. जून. २०२१) :- पिंपरीमधील स्वर्गीय चेतनदास मेवानी सभागृहाच्या समोर सुरू असलेल्या कल्याण मटका नावाच्या जुगार अड्ड्यावर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने सोमवारी दुपारी सव्वा चार वाजताच्या सुमारास छापा मारला.
यामध्ये पोलिसांनी चार हजार ७०० रुपये रोख रक्कम, नऊ हजार ५०० रुपयांचे दोन मोबाईल फोन आणि दहा रुपयांचे मटका खेळण्याचे साहित्य, असा १४ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
















