- सांगवी व वाकड परिसरातून दुचाकींची चोरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९. जून. २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरात वाहन चोरट्यांचा सुळसुळाट माजला आहे. सोसायटीच्या पार्किंगमधून ७० हजार रुपये किमतीची बुलेट चोरट्यांनी चोरून नेली. हा प्रकार सोमवारी (दि. २८) सकाळी साडेनऊ वाजता उघडकीस आला. पवनकुमार कैलास परमार (वय ३०, रा. नवी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.
४५ हजार रुपये किमतीची पल्सर अज्ञात चोरट्यांनी सोमवारी सकाळी दहा वाजता गणेश मंदिर थेरगाव येथून चोरून नेली. अजय विजय फाटक (वय २९, रा. डांगे चौक, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत. पंधरा हजार रुपये किमतीची पल्सर दुचाकी अज्ञात चोरट्यांनी पवना हॉस्पिटलच्या पार्किंगमधून चोरुन नेली. हा प्रकार २६ जून सायंकाळी साडेसात ते २७ जून सकाळी सात वाजताच्या कालावधीत घडला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.
















