न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९. जून. २०२१) :- राष्ट्रवादी युवती काँग्रेस व पिंपरी विधानसभेच्या युवती कार्याध्यक्ष लालबी शेख लोखंडे यांच्यावतीने गरीब व निराधार लहान मुले तसेच बंधू व भगिनी यांना चिंचवड, मोरवाडी स्टेशन, निगडी, आकुर्डी अशा विविध ठिकाणी अन्नाच्या पाकिटाचे वाटप करण्यात आले.
यावेळी युवती अध्यक्षा वर्षा जगताप, लालबी शेख लोखंडे, अजय चव्हाण, नेहा पडवळ, शालाका बनकर, मनाली कुटे, राजश्री अहिरे, रविराज काळे, अरविंद लोखंडे, मंगेश पवार, पीटर जाधव, सूर्यकांत सातपुते, अंकित, अशोक भडकुम्बे आदी उपस्थित होते.
















