- चोरट्यांकडून एटीएमचा डिस्प्ले, कॅश डोअर व एसएनजी लॉकचे नुकसान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जून २०२१) :- महाराष्ट्र बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. मशीनचे नुकसान करून रोख रक्कम चोरुन नेण्याचा प्रयत्न केला. तळवडे येथे सोमवारी (दि. २०) रात्री दीड ते सव्वादोनच्या सुमारास ही घटना घडली. अरविंद मूकुंदराव वायकुळे (वय ५८, रा. बावधन खुर्द, पुणे) यांनी याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळवडेमधील गणेशनगर येथे महाराष्ट्र बँकेचे एटीएम आहे. अज्ञात चोरटे सोमवारी मध्यरात्री दीड ते सव्वा दोनच्या सुमारास एटीएम सेंटरमध्ये गेले.
रोकड चोरी करण्यासाठी एटीएमचा डिस्प्ले युनिट व कॅश डोअरचे नुकसान करून एसएनजी लॉकचे नुकसान केले. तसेच एटीएम मशीनमधून रोकडचोरी करण्याचा अज्ञात चोरट्यांनी प्रयत्न केला. पोलीस उपनिरीक्षक संदेश इंगळे तपास करीत आहेत.
















