- कंपनीचे ५० लाखांचे नुकसान; पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जून २०२१) :- पिंपरीच्या केएसबी कंपनीचा सर्वरचा अनधिकृतपणे ॲक्सेस घेऊन कर्मचाऱ्यांचा डाटा असणाऱ्या १५० फाईल करप्ट केल्या. यामुळे कंपनीचे तब्बल ५० लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले.
ही घटना २७ फेब्रुवारी २०२१ रोजी घडली. नरेंद्र वसंत देशपांडे (वय ५२, रा. वारजे माळवाडी, पुणे) यांनी मंगळवारी (दि. २९) पिंपरी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
















