- पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; एकाला अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जून २०२१) :- ब्राऊन शुगर विक्रीसाठी स्वतःकडे ठेवली असल्याची माहिती अमलीपदार्थ विरोधी पथकाला मिळाली. पोलिसांनी पिंपरीच्या भारतनगर झोपडपट्टीतील लक्ष्मी मंदिराजवळ छापा मारून एका आरोपीला ताब्यात घेतले.
चार लाख २५ हजार रुपये किमतीची ८५ ग्रॅम ब्राउन शुगर पोलिसांनी जप्त केली. पोलीस हवालदार बाळासाहेब सूर्यवंशी यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार डिका सागर थोरात (वय ३६), रीना बाबा रणदिवे (दोघे रा. भारतनगर झोपडपट्टी, पिंपरी), स्वामी अण्णा (रा. सायन मुंबई) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डिकाला पोलिसांनी अटक केली आहे, बाकी फरार आहेत. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
















