- चिखली पोलिसांकडून एकाला अटक; तिघांवर गुन्हा दाखल..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जून २०२१) :- एका वाहनामधून तीन गाईंना कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची माहिती चिखली पोलिसांनी मिळाली. पोलिसांनी मंगळवारी पहाटे पावणे चार वाजताच्या सुमारास वाहनावर कारवाई केली.
आरोपी खंडू सुभाष पाटील (वय २१), इर्शाद हमिद कुरेशी, युसुफ रज्जाक कुरेशी, फारुख सत्तार कुरेशी (वय ३७, सर्व रा. पिंपरी) या चौघांवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम ९, ५ (अ), ५ (ब) व प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम कलम ११ (घ) (ड) नुसार गुन्हा दाखल केला.
खंडू पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.
















