- भोसरीतील पुना इंजिस्टेक कंपनीतील घटना; कामगाराचा मृत्यू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जून २०२१) :- एमआयडीसी भोसरीतील पुना इंजिस्टेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मालकाच्या निष्काळजीपणामुळे अकुशल कामगाराचा बळी गेला आहे. मालकाने कामाचा अनुभव नसताना व सुरक्षेसाठी आवश्यक ती उपकरणे न देता अकुशल कामगाराला कुशल कामगाराचे काम लावले.
एअर बेलो जॉब लिकेज आहे का? हे पाहण्यासाठी एअर प्रेशरने टायरमध्ये हवा भरत असताना क्लॅम्पिमचे बोल्ट स्लिप झाले. त्यामुळे उडून तो जाॅब कामगाराच्या तोंडाला, गळ्याला आणि कपाळाला लागला. गंभीर जखमी झाल्याने कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना पाच जून रोजी घडली.
विक्रम लोकबहादुर भूल असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. त्याचे वडील लोकबहादुर जयसिंग भूल (वय ५०, रा. एमआयडीसी भोसरी. मुळ रा. नेपाळ) यांनी मंगळवारी (दि. २९) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कंपनी मालक सोपान येवले व जयंत राणे यांच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम ३०४ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
















