- शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचा पुढाकार..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जून २०२१) :- निगडीतील भक्ती-शक्ती श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि जगतगुरु संत तुकाराम महाराज उड्डाण पुलाचा वर्तुळाकार मार्ग पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुला केला जात नव्हता.
त्यासाठी पक्ष व सामजिक संघटनांनी पालिकेकडे मागण्या केल्या. मात्र उद्घाटन होत नव्हते. अखेर सत्ताधारी भाजप व पालिका प्रशासनाच्या अपरोक्ष शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने आज (बुधवारी) पुलाचे उद्घाटन उरकले व पूल वाहतुकीसाठी खुला केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, शिवसेना नगरसेवक अमित गावडे, तानाजी खाडे, फजल शेख, विशाल वाकडकर, विशाल काळभोर, विजय लोखंडे, वर्षा जगताप आदी उपस्थित होते.
















