- पिंपरीतील घटना; नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जुलै २०२१) :- पाळीव कुत्र्याला फिरवण्यासाठी गेले त्यावेळी आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून मारहाण केली. फिर्यादी यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात तक्रार दिली. या कारणावरून आरोपीने फिर्यादी यांच्या घरासमोर जाऊन ‘तू आमच्या विरुद्ध तक्रार का दिली. तुला आज सोडणार नाही’. असे म्हणत बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादीला तलवारीने मारून जखमी केले.
हा प्रकार मंगळवारी (दि. २९) रात्री पावणेआठ वाजताच्या सुमारास भाटनगर पिंपरी येथे घडला. देवदास मोहन मलकेकर (वय २०, रा. भाटनगर, पिंपरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सुभाष माचरे, जयदेव सुभाष माचरे, राजतिलक सुभाष माचरे (तिघे रा. भाटनगर, पिंपरी), अजय परदेशी, विकी गायकवाड मळ्या, आशिष (पूर्ण नाव माहीत नाही) आणि अन्य तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.