- फोटो नसलेल्या मतदारांच्या नावांची यादी जाहीर..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जुलै २०२१) :- २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या ४९१ यादी भागामधील ७ हजार ६९६ मतदारांची छायाचित्र मतदार यादीमध्ये नाहीत.
छायाचित्र नसलेल्या मतदारांच्या नावांची यादी जिल्हाधिकारी पुणे (www.pune.nic.in) व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या(www.pcmcindia.gov.in) या संकेतस्थळावर माहितीसाठी व संपर्कासाठी उपलब्ध केलेली आहे.
मतदार यादीमध्ये छायचित्र नसलेल्या मतदारांनी अलीकडच्या काळातील २ रंगीत छायचित्र व रहिवास पुराव्यासह (लाईट बिल, गॅस पुस्तक, राष्ट्रीयकृत बँकेचे खातेपुस्तक, पासपोर्ट इ) २०५ चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय, दुसरा मजला, ग क्षेत्रीय कार्यालय थेरगाव येथे समक्ष अथवा शनिवार आणि रविवारी विशेष शिबिरात मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांकडे जमा करावे, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी स्मिता झगडे यांनी केले आहे.