- परिवहन विभाग पोलीस कारवाई करणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जुलै २०२१) :- करोना काळात नागरिकांना परिवहन विभागात शिकाऊ अनुज्ञप्ती परवाना ऑनलाइन पद्धतीने देण्यासाठी प्रणाली सुरू करण्यात आली आहे. मात्र, या प्रणालीचा काही ठिकाणी गैरवापर केला जात आहे.
अर्जदार उमेदवारांऐवजी दुसऱ्याच व्यक्तीकडून चाचणी दिल्याच्या घटना घडत आहेत. याबाबत परिवहन विभागाकडे तक्रारी आल्या आहे. ऑनलाइन सुविधेचा गैरवापर करणाऱ्या अर्जदार व संबंधित मध्यस्थ अनधिकृत व्यक्तीवर आवश्यक ती पोलीस कारवाई करण्यात येणार.
याप्रकरणी दोषी ठरलेला अर्जदार हा मोटार वाहन कायदा कलम १९ अन्वये अनुज्ञप्ती धारण करण्यास कायमस्वरुपी अपात्र ठरेल, असा इशारा परिवहन विभागाच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. महा ई सेवा केंद्र, मोटर ड्रायव्हिंग स्कूल, इंटरनेट कॅफे या सुविधांचा गैरवापर करत असतील अशा संस्थाविरुद्ध पोलीस कारवाई केली जाईल, ज्या नागरिकांना असे गैरप्रकार निदर्शनास येतील त्यांनी संकेत स्थळावर तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.