- १८ ते ४४ व त्यापुढील वयोगटासाठी कोविशिल्ड व ‘कोव्हॉक्सीन’ चा डोस..
- परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही मिळणार कोविड डोस…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जुलै २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरात उद्या शनिवारी (दि. ०३) रोजी ‘ कोविशिल्ड ’ चा डोस १८ ते ४४ वर्षे वयोगटामधील फक्त पहिला डोस हा १०० टक्के ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुकिंग केलेल्या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. कोविन अॅपवर नोंदणी करण्यासाठी दि. ०३-०७-२०२१ सकाळी ८.०० नंतर स्लॉट, बुकींग करण्यासाठी ओपन करण्यात येतील.
हा डोस कै. ह. भ. प. प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डी, संजय काळे सभागृह, रोटरी क्लब सेंटर, संभाजीनगर (दिव्यांग नागरिकांकरिता) साई अंब्रेला, संभाजीनगर दवाखाना, घरकुल दवाखाना चिखली, पिं.चिं. मनपा. शाळा जाधववाडी, रुपीनगर शाळा, यमुनानगर रुग्णालय प्राथमिक शाळा – ९२, मोरे वस्ती, म्हेञे वस्ती, तळवडे समाज मंदीर शाळा, स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल, जिजामाता पार्क, फुलेनगर, आचार्य अत्रे सभागृह वाय.सी.एम रुग्णालयाजवळ नेहरुनगर उर्दु शाळा, एस. एस. अजमेरा स्कुल, अजमेरा, संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, इंद्रयनीनगर, भोसरी, अंकुशराव लांडगे नाटयगृह, भोसरी, पिं. चिं. मनपा. शाळा बोपखेल, सखुबाई गार्डन, भोसरी, अहिल्याबाई होळकर सांगवी मनपा शाळा, निळुफुले नाटयगृह, सांगवी, खिवंसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाव, पिंपळे निलख इंगोले मनपा शाळा, पि. निलख दवाखानाजवळ, आबाजी रामभाऊ भुमकर प्राथमिक शाळा, भूमकर वस्ती, मारुती गेणु कस्पटे प्राथमिक शाळा, कस्पटे वस्ती, वाकड, कांतीलाल खिंवसरा पाटिल प्राथमिक शाळा, मंगलनगर थेरगाव-३३, भाटनगर दवाखाना पिंपरी, अण्णासाहेब मगर शाळा, पिंपळे सौदागर, नवीन जिजामाता रुग्णालय, काकाज इंटरनॅशनल स्कुल, तापकिर मळा, काळेवाडी, फकीरभाई पानसरे उर्दु शाळा, चिंचवड स्टेशन, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय, चिंचवड, पुणे, मानसरोवर गुरुव्दारा, वाल्हेकरवाडी, कामत हॉस्पीटल पिंपरी, नर्सिंग स्कुल, चिंचवड, सेक्टर नं.२९, मोरेश्वर भोंडवे कार्यालयाजवळ, पुनावळे, मल्हाराव विठठल तरस मराठी मनपा शाळा नं ९५ विकासनगर, किवळे या ३५ लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत १००, २००, ३००, ४०० लाभार्थ्यांच्या क्षमतेने मिळेल.
वय ४५ वर्षा पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थ्यांना आणि HCW व FLW यांना ‘कोविशिल्ड’ चा पहिला डोस व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान (८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत) देण्यात येणार आहे. या अनुषंगाने लसीकरणाचा डोस पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या हेगडेवारजलतरण तलाव, (पॅनअर्थो रुग्णालयासमोर) इ.एस.आय.एसहॉस्पीटल- मोहननगर, चिंचवड पिं.चिं. मनपा. कन्या शाळा,चिखली आर.टी.टी.सी सेंटर यमुनानगर रुग्णालय स्केटिंग ग्रांऊड, सेक्टर नं.२१ यमुनानगर पिं.चिं. मनपा. शाळा, खराळवाडी मासुळकरकॉलनी आय हॉस्पिटल दिनदयाल शाळा पवना बॅक मागे, संत तुकाराम नगर पिंपरी क्वालिटी सर्कल, भोसरी सावित्रीबाईफुले, प्रायमरी स्कुल,मोशी दवाखाना छञपतीशाहु महाराज प्राथमिक विद्यालय, दिघी (सी एस एम) पंडित जवाहरलाल नेहरु शाळा, च-होली गंगोञी पार्क, दिघी नवीन भोसरी रुग्णालय गणेश इंग्लि श स्कुल, दापोडी शंकुतला शितोळे शाळा, वेताळ महाराज सोसायटी, जुनी सांगवी बालाजी लॉन्स, नदी शेजारी जुनी सांगवी कासारवाडी दवाखाना पि.चि. मनपा शाळा, वाकड पिं.चिं. मनपा. शाळा राहटणी पिं.चिं. मनपा. शाळा ,पवनानगर, काळेवाडी कर्मवीर भाऊराव पाटील, पिंपरी वाघेरे ड प्रभाग शाळा मनपा शाळा किवळे बिजलीनगर दवाखाना बापुराव ढवळे प्रायमरी स्कुल, पुनावळे अश्विानी मेडीकल फाऊंडेशन, मोरया हॉस्पीटल, चिंचवड मनपा शाळा, वाल्हेकरवाडी या २८ लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत १००, १५०, २००, ३०० लाभार्थ्यांच्या क्षमतेने मिळेल.
वय ४५ वर्षावरील लाभार्थी यांचे लसीकरण हे केंद्रांना उपलब्ध करुन दिलेल्या लसीच्या क्षमतेनुसार ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ऍप या पध्दतीने करण्यात येईल.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वय वर्षे ४५ पुढील लसीकरण करण्यात येणाऱ्या केंद्रावर सकाळी ८.०० वाजले नंतर टोकन वाटप करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी वेळेआधी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये.
तसेच उद्या ‘कोव्हॉक्सीन’ लसीचा वय वर्षे ४५ पुढील लाभार्थींना पहिला व दुसरा डोस देण्यात येणार असून दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल भोसरी, व नताशा आय क्लिनिक, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव माध्यमिक शाळा, पिं.चिं.मनपा यशवंतराव प्राथिमक शाळा, ग प्रभाग पिंपरी-१८ या लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत पहिला व दुसरा १०० व ५० डोसच्या क्षमतेने देण्यात येईल.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दर गुरुवारी स्तनदा मातांसाठी काही डोस राखीव ठेवण्यात येतील याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी.
तसेच पिंपरी चिंचवड शहरामधील रहिवासी असलेल्या वय वर्षे १८ व त्यापुढील उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक वैध पुराव्यानिशी म्हणजेच परदेशी विद्यापीठ प्रवेश मिळाल्याचे निश्चितीपत्र आणि परदेशी व्हिसा, व्हिसा मिळण्यासाठी संबंधित विद्यापीठाकडून प्राप्त झालेले I-20 किंवा DS-160 From (Admission confirmation letter and I-20 or DS-160 Form for Foreign Visa from concerned overseas university etc.), मुलाखत / रोजगारासाठी परदेशी जात असणा-या नागरीकांना ऑफर पत्र तसेच टोकिओ ऑलंपिकमध्ये भाग घेण्यासाठी नामांकन याबाबतचे पत्र असलेले खेळाडू व त्यांचे प्रशिक्षक यांना या कागदपत्रांच्या पुराव्यासह शनिवार दि. ०३ जुलै २०२१ रोजी नविन जिजामाता रुग्णालय या लसीकरण केंद्रावर ‘कोविशिल्ड’चा पहिला डोस व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना सकाळी-१० ते सायं- ०५ या वेळेत करण्यात येणार आहे.