- वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्याचा नवा पायंडा…
- वृक्षारोपण, अन्नदान व इतर विधायक उपक्रमांचे कौतुक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जुलै २०२१) :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चाकण एमआयडीसी उद्योजक संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे यांचा वाढदिवस सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत, साधेपणाने विविध सामाजिक कार्यक्रमांनी (दि. २४ जून) साजरा करण्यात आला.
पिंपरीतील संत तुकारामनगर येथील गणेश मंदिरात सर्वप्रथम श्रींचा अभिषेक झाला. यावेळी कामगार नेते यशवंत भाऊ भोसले व एकता विकास मित्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर वायसीएम रुग्णालय व परिसरातील गोरगरीब लोकांना अन्नदानाचे वाटप करण्यात आले. एकता विकास मित्र मंडळ व कामगार नेते यशवंतभाऊ भोसले मित्र परिवाराच्या वतीने कार्यक्रमांचे नियोजन व संयोजन करण्यात आले.
दरम्यान चाकण एमआयडीसी फेज ३ उद्योजक संघटनेच्या वतीने चाकण परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात ऑक्सिजन देणाऱ्या वड, पिंपळ, चिंच, कडूनिंब अशा जवळपास १०१ झाडांच्या रोपांचे रोपण करण्यात आले. गया फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय राठोड यांनी झाडे व संरक्षक जाळ्या उपलब्ध करून दिल्या. सह्याद्री इंडस्ट्रीज कंपनीत अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला.
यावेळी कामगार नेते यशवंत भोसले, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मधुकर बाबर, उद्योगपती अनिल भांगडिया, उद्योगपती संजय ढेंबरे, उद्योगपती नामदेव पोटे, एलआयसी इंडियाचे प्रतिनिधी तात्यासाहेब शेवाळे, उद्योगपती उमेश लांडगे, फलटणचे नामांकित डॉक्टर प्रशांत बहिरट, चाकण एमआयडीसी फेज तीन उद्योग संघटनेचे सर्व पदाधिकारी-सभासद, एकता विकास मित्र मंडळाचे अध्यक्ष संदीप आंबवणे, हॉटेल श्रीचे दिपक पाटील, भोसले पेट्रोल पंपाचे मालक विशाल भोसले, भाजपाचे युवा नेते दिनेश पाटील, श्री इंजिनियर्सचे राहुल शितोळे देशमुख, पोलीस पाटील राहुल फडके, निघोजे, कुरूळी व इतर गावांचे स्नेही, मित्र मंडळीनी भेटून व फोनद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. संघटना व त्या व्यतिरिक्त माननीयांच्या सहकार्याने कार्यक्रमाची शोभा वाढवली.
सामाजिक व उद्योग क्षेत्रांमध्ये काम करताना स्वतःच्या वाढदिवसानिमित्त जयदेव अक्कलकोटे यांनी विधायक उपक्रमाच्या माध्यमातून समाजकार्याचा नवा पायंडाच पाडला आहे.