न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ जाने.) :- दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे पक्षीय बैठकीत ”कोरेगाव-भीमा येथे गेल्यावर्षी उसळलेल्या दंगलीत प्रकाश आंबेडकर यांचा हात असल्याचा आरोप खासदार अमर साबळे यांनी केला आहे. प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या नातेवाईकांनी ही दंगल भडकवली. यासाठी त्यांनी माओवाद्यांची मदत घेतली, असा थेट आरोप करीत प्रकाश आंबेडकर यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी”, अशी मागणीही खासदार अमर साबळे यांनी अमित शहा यांच्याकडे केली आहे. या भयंकर विधानाचा शिवसेना व शिवशाही व्यापारी संघ तसेच लहुजी शक्तीसेना पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने खासदार अमर साबळे यांचा जाहीर निषेध व्यक्त केला आहे.
लाखो समाजबांधवांचे श्रद्धास्थान असलेले कोरेगाव भिमा येथे मानवंदना देण्यासाठी (दि. १.) रोजी बारा-बलुतेदार समाज एकत्र आला होता. सर्व बांधवांनी एकत्र येऊन विजयस्तंभास मानवंदना दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी या ठिकाणी जमलेल्या लाखो भिम सैनिकांचे थाटात स्वागत करून, शुभेच्छा दिल्या होत्या.
परंतु, भाजप अध्यक्ष अमित शहा यांची शाब्बासकी मिळविण्यासाठी व वरीष्ठ नेत्यांच्या स्वहस्ते स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी आसुसलेले भाजपचे खासदार अमर साबळे यांनी समाजात पून्हा अशांतता पसरविण्याचे काम केले आहे. तसेच बेताल वक्तव्य करून समाज विघातक विष पेरण्याचे केले आहे, असे खासदार अमर साबळे यांचा निषेध व्यक्त करताना शिवसेना व शिवशाही व्यापारी संघ तसेच लहुजी शक्तीसेना पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष युवराज दाखले यांनी सांगितले आहे.











