न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ जाने.) :- मुळशीमध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेले जमीनीचे व्यवहार यामुळे या ठिकाणी लाचखोरीचे प्रमाण देखील वाढले आहे. जमीनीला मिळणाऱ्या कोट्यावधीच्या भावामुळे याठिकाणचे शेतकरी रातोरात कोट्याधीश होत आहेत. याचाच फायदा घेत महसूल विभागातील अधिकारी लाखोंची लाच घेताना अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात अडकत आहेत.
तक्रारदार यांचे क्षेत्र व वारसा नोंदीचे प्रकरणात तहसिलदार मुळशी यांनी दिलेल्या आदेशानुसार नांव नोंद व क्षेत्र नोंद करून सात बारापत्रकी नोंदी घेण्यासाठी महिला तलाठी आणि कोतवाल यांनी ५० हजाराच्या लाचेची मागणी केली होती.
तक्रारदारानी पुण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. प्राप्त झालेल्या तक्रारीची नोंद घेण्यात आली. त्यामध्ये महिला तलाठी आणि कोतवाल हे लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर गुरूवार (दि. ३) रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाचे पोलिस निरीक्षक घनशाम बळप आणि त्यांच्या सहकार्यांनी सापळा रचुन त्यांच्यावर कारवाई केली. ही कारवाई पुणे विभागाचे पोलिस अधीक्षक संदीप दिवाण, उपाधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली गुरूवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास करण्यात आली आहे.
लाच स्वीकारल्यामुळे सचिन डोंगरे याच्याकडून मोठे घबाड लागण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता लाचलुचपत विभागाने त्याचे मूळ गाव असलेल्या मोहोळ तालुक्यातील पापरी येथील घराची झाडाझडती घेतली. तसेच मोहोळ शहरातील बंगल्याचीसुद्धा तपासणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. तसेच डोंगरे याचे बँक ऑफ इंडियाच्या शाखेतील करण्यात आले.











