- स्पोर्ट्स, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र व क्लासेसचा समावेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जुलै २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील काहीसे निर्बंध आयुक्तांनी आज शनिवारी शिथिल केले आहेत. यात आउटडोअर स्पोर्ट्स व इनडोअर स्पोर्ट्स सोमवारपासून आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील.
इनडोअर स्पोर्ट्ससाठी खेळाडू व कर्मचारी यांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण (दोन डोस) झालेले असणे बंधनकारक आहे. १८ वर्षाखालील खेळाडुसाठी योग्य खबरदारीने फक्त ट्रेनिंग सुरु ठेवता येईल.
शहरातील स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र, क्लासेस ५० टक्के क्षमतेने सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील. प्रशिक्षक आणि प्रशिक्षणार्थी यांचे लसीकरण (किमान प्रथम डोस) घेतलेला असणे बंधनकारक आहे.