- वाहतुक बदलाबाबत सहकार्य करण्याचे पोलिसांचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जुलै २०२१) :- पिंपरीतील इंदिरा गांधी उड्डाणपुल दुरुस्तीच्या कामामध्ये पहिल्या टप्प्यातील गोकुळ हॉटेल ते पिंपरी पुलापर्यंतचे काम नियोजीत आहे. दरम्यान पिंपरी वाहतुक विभागा अंतर्गत दुस-या टप्प्यातील वाहतूकीत बदल करण्यात आले आहेत.
अहिल्यादेवी चौकाकडील वाहतुक क्रोमा शोरुम मार्गे न सोडता सरळ पिंपरी चौकातुन गोकुळ हॉटेल मार्गे वळवावी लागणार आहे. पिंपरी चौकाकडुन गोकुळ हॉटेल मार्गे पिंपरी पुलाकडे येणारी वाहतूक ही दुहेरी मार्गाने राहील. हे वाहतूक डायव्हर्शन (दि. ०१ जुलै ते ३० ऑक्टोबर २०२१) या कालावधीकरीता वैध राहिल.
नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. वाहतुक बदलाबाबत वॉर्डन व वाहतुक कर्मचारी यांना सहकार्य करावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड शहर वाहतुक शाखा पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी केले आहे.