- पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जुलै २०२१) :- नेहरूनगर येथील संतोषी माता चौकात फिर्यादी मासे विक्रीचा व्यवसाय करतात. आरोपी हे फिर्यादीच्या दुकानावर आले. फिर्यादीला मारहाण करून त्यांच्या खिशातील ५०० रुपये काढून घेतले. आरोपींनी त्यांच्यावर चॉपरने वारही केला.
त्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी (दि. २) रोजी घडली. रामअजोरे बनवारी परदेशी (वय ४५ रा. घरकुल, स्पाईन रोड, चिखली) यांनी शुक्रवारी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
रोहित प्रवीण धनवे (वय १८, रा. नेहरूनगर, पिंपरी), कैलास पाटोळे (वय १८, रा. फुलेनगर, एमआयडीसी, भोसरी), ऋतिक सोरटे (वय २०, रा. राजीव गांधी वसाहत, पिंपरी), अशी आरोपींची नावे आहेत.