- १८ वर्षावरील लाभार्थ्यांना १०० टक्के ऑनलाईनची अट..
- ४५ वर्षावरील सर्वांना ऑन द स्पॉट डोस..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ जुलै २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरात उद्या सोमवारी (दि. ०५) रोजी ‘ कोव्हॉक्सीन ’ १८ ते ४४ वर्षे वयोगटासाठी फक्त पहिला डोस हा १०० टक्के ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुकिंग केलेल्या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. कोविन अॅपवर नोंदणी करण्यासाठी सकाळी ८.०० नंतर स्लॉट बुकींग करण्यासाठी ओपन करण्यात येतील.
हा सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरी, कै.ह.भ.प.प्रभाकरमल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डी, यमुनानगररुग्णालय, आचार्यअत्रे सभागृह वाय.सी.एम रुग्णालयाजवळ, अहिल्याबाईहोळकर सांगवी मनपा शाळा, खिवंसरापाटील हॉस्पिटल, थेरगाव, नवीन जिजामाता रुग्णालय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय, चिंचवड या आठ लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत २०० लाभार्थ्यांच्या क्षमतेने मिळेल.
वय ४५ वर्षा पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थ्यांना आणि HCW व FLW यांना ‘कोव्हॉक्सीन’ चा पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर २८ दिवसानंतर देण्यात येणार आहे. या अनुषंगाने लसीकरणाचा डोस पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या प्राथमिक शाळा – ९२, मोरे वस्ती, म्हेञे वस्ती, इ. एस. आय. एस हॉस्पीटल- मोहननगर, चिंचवड, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, नवीन भोसरी रुग्णालय, कासारवाडी दवाखाना, अण्णासाहेब मगर शाळा पिंपळे सौदागर, पिंपळे निलख इंगोले मनपा शाळा, पि. निलख दवाखानाजवळ, प्रेमलोक पार्क दवाखाना या आठ लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत १०० लाभार्थ्यांच्या क्षमतेने मिळेल. वय ४५ वर्षावरील लाभार्थी यांचे लसीकरण हे केंद्रांना उपलब्ध करुन दिलेल्या लसीच्या क्षमतेनुसार ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ऍप या पध्दतीने करण्यात येईल.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वय वर्षे ४५ पुढील लसीकरण करण्यात येणाऱ्या केंद्रावर सकाळी ८.०० वाजले नंतर टोकन वाटप करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी वेळेआधी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये. तसेच दि. ०५/०७/२०२१ रोजी कोव्हिशील्ड लसीचा पुरेसासाठा उपलब्ध नसल्याने या लसीचे लसीकरण