- प्रशासनाला झुगारून आजपासून सायं. ७ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवणार..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जुलै २०२१) :- पिंपरीतील व्यापारी सोमवारपासून (दि. ५) सायंकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवणार आहेत. व्यापाऱ्यांच्या पिंपरी येथे झालेल्या बैठकीत नुकताच हा निर्णय घेण्यात आला आहे.
दुकानांची वेळ सध्या कमी आहे. त्यामुळे गर्दी होते. दुकानांची वेळ वाढविल्यास बाजारपेठेतील गर्दी कमी होईल. वीकेंड लॉकडाऊनला दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी नाही. त्यामुळे व्यापारी आर्थिक अडचणीत आले आहेत.
याचमुळे दुकाने सायंकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यावर प्रशासनाने कोणतीही कारवाई केल्यास मंगळवारपासून बेमुदत बंद पुकारण्यात येईल, असा इशारा पिंपरी मर्चंट फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवानी यांनी दिला आहे.